डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप

403

पुणे, दि. १९ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राजकीय आणि इतर दबाव होता. २० तारखेच्या आत काहीतरी केले असे दाखवायचे होते म्हणून ही अटक करण्यात आली असल्याचा आरोप, अंदुरेच्या वकिलाने केला आहे.

दाभोळकर हत्येप्रकरणी आधी वीरेंद्र तावडेला अटक झाली आहे. त्याचे चार्जशीट देखील दाखल करण्यात आले आहे. चार्जशीटमध्ये कोठेही सचिन अंदुरेचे नाव नाही. त्या चार्जशीटमध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे आहेत. ते फरार आहेत. आतापर्यंतच्या तपासात कोठेही अंदुरेचे नाव आलेले नाही. तरीही त्याला अटक करण्यात आली आहे. अंदुरेला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी. त्यानंरच्या सुनावणीवेळी विरेंद्र तावडे याच्या विरोधातील चार्जशीट कोर्टात सादर करण्यात यावे, अशी मागणी अंदुरेच्या वकीलाने केली आहे.