डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; शरद कळसकरच्या सीबीआय कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

76

पुणे, दि. १५ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या सीबीआय कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज (शनिवार) शरद कळसकरला न्यायालयात हजर करण्यात आले.  

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकरने दाभोलकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयच्या वकिलांनी याआधी न्यायालयात केला आहे.

नालासोपारा आणि राज्याच्या अन्य भागांमधून वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना एटीएसने अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी बॉम्ब, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती. शरद कळसकर हा मुळचा औरंगाबादचा रहिवासी आहे.