डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी शरद कळसकरला १५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

72

पुणे, दि. १० (पीसीबी) – नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना न्यायालयीन कोठडी, तर शरद कळसकरला १५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी आज (सोमवार) पुणे न्यायालयाने सुनावली.

यावेळी सीबीआयच्या तपासावर न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली. पुणे न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायाधीश एस.ए.सय्यद यांच्यासमोर सुनावणी झाली. सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे आणि आरोपीचे वकील धर्मराज यांनी काम पाहिले. दोन्हीकडचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना न्यायालयीन कोठडी, तर शरद कळसकरला १५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.