डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी शरद कळसकरची आज पुणे न्यायालयात हजेरी

258

पुणे, दि. ४ (पीसीबी) – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करून आज (मंगळवार) दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. शस्त्रसाठा प्रकरणातील पोलीस कोठडी संपल्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला सीबीआयच्या हवाली केले आहे.

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला अटक केली आहे. सचिन अंदुरे आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.