डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरेला पुण्यातील शिंदे पुलावर नेऊन चौकशी

466

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला आज (शुक्रवार) सीबीआयच्या विशेष पथकाने पुण्यामध्ये आणले होते. डॉ. दाभोलकरांची हत्या झालेल्या ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सचिन अंदुरेला नेऊन स्पॉट व्हीझीट करुन अंदुरेची चौकशी सीबीआयने केली. तसेच परिसराची देखील पहाणी केली.

सचिन अंदुरेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्‍न झाले आहे.  २० ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळील शिंदे पुलावर गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या तब्बल पाच वर्षानंतर या प्रकरणातल्या हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.