डॉ. दाभोलकरांच्या हत्येदिवशी सचिन अंदुरे कामावर गैरहजर

346

औरंगाबाद, दि. १ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेला   संशयित सचिन अंदुरे औरंगाबादेतील ज्या कापड दुकानात कामाला होता, तिथे तो २० ऑगस्टला म्हणजेच दाभोलकर यांच्या हत्येदिवशी कामावर गैरहजर होता, अशी नवी माहिती समोर आली आहे.

अंदुरे काम करत असलेल्या दुकानाचे मालक कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक ठेवतात. त्यात सचिन अंदुरे २० ऑगस्टला कामावर नसल्याची नोंद आहे. सीबीआयने हे हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले आहे.

दाभोलकर हा हत्या प्रकरणात हे रजिस्टर सीबीआयसाठी मोठा पुरावा ठरु शकते. १९ ऑगस्टला सचिन अंदुरेची साप्ताहिक सुट्टी होती. २० ऑगस्टला हजेरी राजिस्टरवर सचिनची रजिस्टरवर सहीच नाही. त्यामुळे अंदुरेकडे याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान,  सचिन अंदुरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. न्यायाधीश आर. आर. भाळगट यांनी हा निर्णय दिला.