डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही घसरण सुरुच, आजही रुपया 19 पैशांनी घसरला

252

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1158 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 359 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,930 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 359 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,808 वर पोहोचला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही घसरण सुरुच असून आजही रुपया 19 पैशांनी घसरला आहे. एक डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आता 77.42 इतकी झाली आहे. आज शेअर बाजारातील 747 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2542 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 84 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरसह सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 ते 4 टक्क्यांची घसरण झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही – टक्क्यांची घसरण झाली आहे.

गुरुवारी शेअर बाजारात Adani Ports, IndusInd Bank, Tata Motors, Tata Steel आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Wipro या एकमेव कंपनीच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपनीचे शेअर्स वधारले -Wipro- 0.40 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले – Adani Ports- 6.13, IndusInd Bank- 5.79, Tata Steel- 4.12, Tata Motors- 4.08, Hindalco- 3.95.

जागतिक शेअर बाजारातही विक्रीचा दबाव असल्याचे संकेत आहेत. आशियाई शेअर बाजारातही मोठा दबाव आहे. SGX NIFTY निर्देशांक 170 अंकाखाली आहे. तर, दुसरीकडे एप्रिल महिन्यातही अमेरिकेत किरकोळ महागाई 8.3 टक्क्यांवर राहिल्याने अमेरिकन शेअर बाजारात विक्रीच्या सपाट्याने घसरण झाली आहे. बुधवारी, Dow Jones निर्देशांकात 300 अंकाहून अधिक घसरण नोंदवण्यात आली होती.