डॉक्टरचे क्रौर्य! पाकिस्तानातल्या ४०० पेक्षा जास्त मुलांना HIV ची लागण

251

कराची, दि. १८ (पीसीबी) – डॉक्टर म्हटले की त्याच्यावर कोणताही रूग्ण डोळे झाकून विश्वास ठेवतो. मात्र एका डॉक्टरच्या क्रौर्यामुळे ४०० पेक्षा जास्त मुलांना HIV ची लागण झाली आहे. त्यामुळे या मुलांचे आयुष्य आता पणाला लागले आहे. पाकिस्तानातल्या रातोडेरो या ठिकाणी ही घटना घडली आहे. दक्षिण पाकिस्तानातल्या लरकाना या ठिकाणी रहमाना बीबीच्या १० वर्षांच्या मुलाला ताप आला. हा ताप नेहमीच्या तापासारखा रहमाना यांना वाटला नाही. त्यामुळे त्या मुलाला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी या दहा वर्षांच्या मुलाला पॅरासिटामोल हे सिरप दिले आणि काहीही चिंता करू नका असे सांगितले. रहमाना मुलाला घेऊन घरी आल्या मात्र त्यांना हे समजले की शेजारच्या गावातल्या मुलांना ताप आल्यामुळे HIV ची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली.

रमझाना या त्यांच्या मुलाला घेऊन रूग्णालयात गेल्या तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या मुलालाही HIV ची लागण झाली आहे. एवढंच नाही तर इतर एकूण ४०० पेक्षा जास्त मुलांना HIV ची लागण झाली आहे. एकूण ५०० जणांना HIV ची लागण झाली आहे. त्यापैकी ४०० जास्त मुलांना HIV ची लागण झाली आहे. आम्हाला जेव्हा कळलं की आमच्या मुलालाही HIV ची लागण झाली आहे तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटले. एवढ्या कमी वयात त्याला HIV ची लागण झाली याचे अतीव दुःख झाले असे रमझान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातल्या डॉक्टरने निष्काळजीपणा दाखवून वापरलेली सीरिंज पुन्हा पुन्हा वापरली. त्याचमुळे हा HIV संक्रमित झाला अशी माहिती समोर आली आहे. डॉक्टर मुज्जफर गांघरो असे त्याचे नाव आहे. त्याने एप्रिल महिन्यात वापरलेल्या सीरिंज पुन्हा पुन्हा वापरल्या त्यामुळे HIV लरकाना येथील रूग्णांमध्ये पसरला. या डॉक्टरला एड्स असल्याने त्याने हे कृत्य केले. या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.