डुडूळगावात बांधकाम साईटवरील क्रेन अंगावर कोसळ्याने तिघा बांधकाम मजूरांचा मृत्यू

50

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – एका बांधकाम साईटवरील क्रेन अंगावर कोसळ्याने तीघा बांधकाम मजूरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास डुडूळगाव येथील बांधकाम साईटवर घडली.

अमर राठोड (वय २८), भगवान गायकवाड (वय २९) आणि पांडुरंग चव्हाण (वय ३५) असे क्रेन अंगावर पडून मृत्यू झालेल्या तिघा बांधकाम मजूरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवार सकाळी साडेअकराच्या सुमारास डुडूळगाव येथील रिगल रेसिडेन्सी या बांधकाम साईटवर बांधकाम सुरु होते. यावेळी माल वाहून नेणारी एक क्रेन अचानक खाली कोसळली. ही क्रेन खाली काम करत असलेले बांधकाम मजूर अमर, भगवान आणि पांडुरंग यांच्या अंगावर पडली. यावेळी तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. क्रेन अचानक कोणत्या कारणामुळे खाली कोसळली हे अद्याप समजू शकले नाही. सध्या दिघी पोलिस ठाण्यात अकसमित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.