‘डायल 112’ ची उत्तम कामगिरी; हरवलेल्या अल्पवयीन मुलींना अवघ्या काही तासात शोधून दिल पालकांच्या ताब्यात

225

डुडुळगाव, दि.१३ (पीसीबी) : डायल 112 फोर व्हीलर यांना ‘दोन मुली हरवल्या आहेत. वय साधारण सहा ते आठ वर्ष असून देव फाटा, प्रेम साई अपार्टमेंट, या भागात राजनच्या आहेत’, असा कॉल आला होता. त्या दरम्यान व पो.नी. जाधव व डायल 112 चे नेमलेले पोलीस अंमलदार तळपे व पोलीस अंमलदार जाधव व त्या ठिकाणी पेट्रोलिंग करिता नेमलेल्या महिला पोलीस शिपाई २२०३ पोटे यांनी तात्काळ या कॉलची दखल घेऊन मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तासांमध्ये अथक प्रयत्नांनंतर त्या मुली सापडल्या. या मुली सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले.