डायनोमर्क कंट्रोलच्या वतीने गुरूपौर्णीमा निमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

31

पिंपरी, दि. 23 (पीसीबी): डायनोमर्क कंट्रोलच्या वतीने 10 वीत उतीर्ण झालेल्या कामगारांच्या पाल्याचा प्रमाणपत्र,बँग,शालेय उपयोगी वस्तू,रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक कामगारावर उपासमारीची वेळ आली. अशा कठीण परीस्थितीतही सामाजिक बांधिलकी समजून गुरूपौर्णीचे औचीत्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा करण्यात आला.

दरवर्षी कामगारांच्या मुलींच्या लग्नाला कंपनीच्या वतीने श्रीमती नलिनी राऊत यांच्या स्मरणार्थ आकरा हजार रुपये कन्यादान म्हणून दिले जातात. यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत म्हणाले की आमची आस्थापना हि फक्त व्यवसाय न करता कामगारांशी कौटुंबिक नाते जपणारी आस्थापना असून कामगारांच्या कटूबीयांच्या सदैव पाठीशी उभी आहे. कामगारांचा मुलगा उच्चशिक्षित झाला तरच कामगारांचे जिवनमान उंचावेल, आणि त्याचे मनोबल वाढविण्यासाठी आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवीत आसतो असे राऊत म्हणाले.

गुणवंत कामगार आण्णा जोगदंड म्हणाले की,ही आस्थापना आम्हाला कुटुंब असल्याचे वाटते, आम्ही सर्व कामगार ताणतणावात काम न करता खेळीमेळीच्या वातावरणात काम करत आसतो, आम्हा सर्व कामगारांना या आस्थापनात काम करत आसल्याचा आभिमान वाटतो.

मनुष्यबळ विकास प्रमुख सूर्यकांत मुळे म्हणाले की ही आस्थापना कामगारांची हित  जपणारी आस्थापना असुन त्यांच्या पाठीशी सदैव  राहू.कामगारही सदैव व्यवस्थापनाशी सहकार्य करत आहेत.
यावेळी जे.आर.डी टाटा उद्योग सखी पुरस्कार मिळालेल्या अक्षरा राऊत व उद्योग सारथी पुरस्कार मिळालेले हेमंत नेमाडे याचा सन्मान सर्व कामगारांच्या वतीने भेटवस्तू देऊन करण्यात आला.यावेळी
व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परीषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले अध्यक्ष सुदाम भोरे ,ढोकळे दिगबर,यांच्या हस्ते ,श्रेयस जोगदंड, मनाली शेंडगे,साहील पाटील, तेजस मोरे,प्रसाद मडोळे अनमोल रणजित सिंग तसेच मागील दोन वर्षातील 10 व 12 उतीर्ण विद्यार्थ्यांचा पण  गुणगौरव करण्यात आला.

संचालिका अमिता राऊत यांनी गुरूपौर्णीमेनिमीत आपल्या जिवनातील गुरुचे महत्त्व सांगितले तर प्रत्येक जन शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणून ज्ञान घेतले पाहिजे तर निवेदक दिगंबर ढोकळे यांनी विद्यार्थ्यांना करीयर विषयी माहिती दिली.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, संचालिका,सौ अमीता राऊत, पुरूषोत्तम सदाफुले,सुदाम मोरे,दिगंबर ढोकळे, गुणवंत कामगार आण्णा जोगदड, मनूषबळ प्रमुख सुर्यकांत मुळे,विभाग प्रमुख दिलीप ईधाते, अक्षरा राऊत, हेमंत नेमाडे,केतकी राऊत, प्रविण बाराथे,राजेश वैद्य,शांताराम पाटील, मोहन कृष्णन ,ईत्यादी विभाग प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत मुळे यांनी केले यशस्वीतेसाठी प्रिया देशमुख, रवी भेंकी,राजेंद्र गोराने यांनी परीश्रम घेतले.

WhatsAppShare