डांगे चौकात  गाडी अडवल्याच्या रागातून वाहतूक पोलीसाला मारहाण

1123

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – रस्त्याच्या कडेल्या लावलेल्या वाहनांना धडक देऊन फरार होण्याच्या तयारीत असलेल्या एका कार चालकासह त्याच्या साथीदाराला वाहतूक पोलीसाने अडवले म्हणून दोघांनी मिळून वाहतूक पोलीसाला शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ३०) रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथील डांगे चौकात घडली.

पोलीस नाईक कुंदन तोतरे (वय ३१, रा. पोलीस वसाहत, शिवाजीनगर) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार कार चालक सुरज परमार (वय २५, रा. नृसिंह मंदिराजवळ, ताथवडे) आणि बापू डांगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक कुंदन तोतरे हिंजवडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. बुधवारी ते थेरगाव येथील डांगे चौकात वाहतूक नियमण करत होते. रात्री आठच्या सुमारास आरोपी सुरज आणि बापू हे दोघे त्याच्या कार क्रमांक (एमएच/१४/एव्ही२०२०) जात होते. यावेळी त्यांनी डांगे चौकातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही वाहनांना धडक दिली. त्यामुळे तोतरे यांनी त्यांना कार थांबविण्यास सांगितले. कार थांबवल्याचा राग आल्याने सुरज आणि बापू या दोघांनी तोतरे यांच्यासोबत शिवीगाळ करुन मारहाण केली. पोलिसांनी सुरज याला अटक केली असून बापू अद्याप फरार आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.