डांगे चौकातील इमारतीत मृतदेह आढळल्याने खळबळ

400

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – डांगे चौकात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास डांगे चौकातील १६ नंबर परिसरात इमारतीच्या तळमजल्यावरच्या खोलीत हा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्ष असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास डांगे चौकातील १६ नंबर परिसरात इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तीन ते चार दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून वाकड पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.