ठाम भूमिका घेणारे प्रतिभावान कलाकार गिरीश कर्नाडांची उणीव भासेल – राज ठाकरे

152

मुंबई, दि. १० (पीसीबी) – निर्भीडपणे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणाऱ्या  प्रतिभावान कलाकाराची नक्कीच उणीव भासेल.  ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाडांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन,  अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाड यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

गिरीश कर्नाड यांचे आज ( सोमवारी)  सकाळी बंगळुरुतील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनावर राज ठाकरे यांनी  शोक व्यक्त  केला आहे.

इतिहास आणि मिथकं ह्यांच्या गुंफणातून समकालीन प्रश्नांवर भाष्य करणारी नाटकं ही गिरीश कर्नाडांनी स्वातंत्र्योत्तर भारतीय रंगभूमीला दिलेली ठेव असून मराठी भाषेवर, रंगभूमीवर मातृभाषेइतकंच मनस्वी प्रेम करणारे कर्नाड हे मराठी आणि कन्नड ह्या भगिनी भाषांमधल्या विचारप्रवाहांचे वाहक होते. निर्भीडपणे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणाऱ्या ह्या प्रतिभावान कलाकाराची नक्कीच उणीव भासेल. गिरीश कर्नाडांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.