ठाण्यात भावी पत्नीने वराला दिले विष, वराचा उपचारादरम्यान मृत्यू

1048

ठाणे, दि. २० (पीसीबी) – वधू-वराने एकमेकांना पसंत करुन लग्न ठरवल्यानंतर वधूने वराला तू मला पसंत नाही असे सांगून चॉकलेटमधून विष देऊन त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना आज (सोमवार) भिवंडी येथून उघडकीस आली.

अरकम असे मयत वराचे नाव आहे. तर याप्रकरणी वधू समरीन हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एकमेकांना पसंत केल्यानंतर अरकम आणि समरीन या दोघांच्या मरजीने घरच्यांनी त्यांचा विवाह ठरवला होता. बरेच दिवस दोघांचे भेटने बोलने सुरु होते. मात्र अचानकपणे समरीन “माझे तुझ्यावरुन मन उडाले, तुला पाहून माझ्या मनात घृणा निर्माण होते. तू मला पसंत नाही. तू माझ्या जीवनातून निघून जा” समरिन अरकमशी अशाप्रकारे बोलू लागली. ऐवढ्यावरच समरीन थांबली नाही. जर माझ्यावर तुझा जीव असेल, तर मी दिलेले विष तू खाऊन टाक? असे बोलून तिने चॉकलेटला विषारी औषध लावून अरकमला ते खाण्यास दिले.  भावी पत्नीचे मन जिंकण्यासाठी अरकम याने विषारी चॉकलेट खाल्याने तो काही वेळातच बेशुध्द पडला. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच अरकमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर त्याचा आज (सोमवारी) मृत्यू झाला.