ठाण्यात भरदिवसा चाकूने वार करून तरूणीची हत्या

1268

ठाणे, दि. ४ (पीसीबी) – ठाण्यात भरदिवसा एका २० वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र,     उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राची विकास झाडे (वय २0) असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरूणीचे नांव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत आरटीओ कार्यालयासमोरच सकाळी ११ वाजता ही घटना घडली. हल्लेखोर  पसार झाला आहे. या हल्ल्यात प्राची गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  दरम्यान, या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधित चौकशी करत आहेत.