ठाण्यात जन्माष्टमी दिवशीच कृष्ण मंदिरात चोरी

129

ठाणे, दि. २ (पीसीबी) – ठाण्यातील जांभळी नाका परिसरात असलेल्या गोवर्धन वैष्णव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी कृष्णाच्या मुर्तीवरील दागिने आणि दानपेटीतील पैसे असा एकूण ३० लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना आज (रविवार) पहाटे उघडकीस आली.

श्रीकृष्ण जन्माष्ठमीच्या दिवशीच चोरट्यांनी केलेल्या या चोरीमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. ही चोरी मध्यरात्रीच्या सुमारास झाली असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. आज सकाळी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अंदाजे ३० लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शक्यता ठाणे नगर पोलीस ठाण्याचे रविकांत मालेकर यांनी व्यक्त केली आहे.