ट्विटरवर राजकीय जाहिराती बंद

211

मुंबई,दि.२०(पीसीबी) – ट्विटर या अधिकृत ब्लॉगिंग साइटने राजकीय जाहिराती स्वीकारणे बंद केले आहे. कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार, संस्था, नेते यांच्या जाहिराती या आठवड्यापासून स्वीकारल्या जाणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केल आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डार्सी यांनी राजकीय जाहिराती स्वीकारणार नसल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.

इंटरनेटवरील जाहिराती या यूजर्सवर जास्त प्रभाव टाकतात. या राजकीय जाहिरातींचा मतदानावर परिणाम होतो. त्यामुळे आम्ही जाहिराती घेण्याचे बंद केल्याचे कंपनीने सांगितले आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय मजकूराची जाहिरातबाजी करण्याच्या संकल्पनेचं ट्विटर खंडन करत आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ट्विटर हे माध्यम नाही. राजकीय संदेश हा लोकांपर्यंत पोहचला पाहिजे तो विकला जाऊ नये यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही राजकीय जाहिराती ट्विटर स्वीकारणार नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करणं हे व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अतिशय परिणामकारक असलं तरी यामुळे राजकारणासाठी याचे मोठे धोके निर्माण होतातअसं ट्विट सीईओ जॅक डॉर्सी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी केलं होतं.

WhatsAppShare