ट्रॅक्टर आणि टॅंकरच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

155

पुणे, दि.२१(पीसीबी) : पुण्याच्या हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टर आणि टँकरचा भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री हडपसरमधील मंतरवाडी रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

रामा विठ्ठल आडे (वय २८, रा. काळेपडळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, अक्षय शिंदे (वय २४) व राहुल संजय कुंभार (वय २४) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात टँकर चालका विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, जेसीबीचे पंचर झालेले चाक घेऊन अक्षय व राहुल हे ट्रॅक्टर चालक रामा आडे यांच्यासोबत जेसीबीचे जात होते. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास ते मंतरवाडी रोडने हडपसरकडे येत होते. त्यावेळी भरधाव टँकर चालकाने त्यांच्या टॅक्टरला जोराची धडक दिली.

धडकेत टॅकरने पलटी होऊन चालक आडे व दोघे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काल खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, आडे यांचा गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दोघेजन जखमी झाले आहेत. दरम्यान, टँकर चालक अपघात होताच तेथून पसार झाला. त्याचा हडपसर पोलीस तपास घेत आहेत.