ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत कोंढवा-सासवड बायपासवर दोघांचा मृत्यू

106

कोंढवा, दि. १७ (पीसीबी) – भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) कोंढवा-सासवड बायपासवर पिसोळी येथे घडली.

राम अगधे माने (वय २६) आणि बबन महादेव इंगळे (वय २६, दोघे रा.वाघजाईनगर,कात्रज) असे मयत दोघांची नावे आहेत. तर आरोपी ट्रकचालक राजेश पासवान (वय ३७, समृध्दी नगर, बिहार) याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज राम आणि बबन हे दोघे त्याच्या दुचाकीवरुन कोंढवा-सासवड बायपासवर पिसोळी येथून जात होते. यावेळी भरधाव ट्रकचालक राजेश याने त्या दोघांना जोरदार धडक दिली. यामध्ये राम आणि बबन या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालक राजेश याला अटक केली आहे.