टोळीयुध्द भडकले, फायरिंगमधे एक ठार

191

पुणे, दि. 22 (पीसीबी): पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध पेटले आहे. लोणीकाळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील हॉटेल सोनाई (ता. हवेली) समोर दोन गँगमधील सराईतांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये तीनजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी राहू (ता. हवेली) येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप (वय-38 रा. चंदननगर, खराडी) याच्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या एका सराईत गुन्हेगारी टोळीमध्ये फायरिंग झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संतोष जगताप हा अप्पा लोंढे टोळीशी सलग्न होता अशी माहिती समोर येतेय.

गोळीबाराच्या या घटनेमध्ये संतोष जगताप (वय-38 रा. चंदननगर खराडी) याचा आणि इतर एकाचा मृत्यू झाला आहे. बॉडीगार्ड मोनु सिंग (वय-40) जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तसेच शेजारील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील या देखील घटनास्थळी गेल्या आहेत.

नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वाळुची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे.

जखमी झालेल्यांना नजीकच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, संतोष जगतापसह दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अति वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

पुण्यात टोळीयुध्द भडकल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगताप हा राहू येथील रहिवाशी आहे.
त्याच्यावर गोळीबार झाला आहे. संतोष जगताप यवत येथील 302 चा गुन्हा मधील आरोपी आहे.
बॉडीगार्ड सोबत कारमधून जात असताना त्याच्यावर गोळीबार झाला आहे. पोलिसांना जागेवर तीन पुंगळ्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि इतर अधिकारी गुन्हयाची सखोल माहिती घेत आहेत.
 
हल्लेखोरांनी संतोष जगताप याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यास उत्तर देण्यासाठी जगतापने त्यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून आहेत. गुन्ह्याची सखोल माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, चार ते पाच हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत.

WhatsAppShare