टोलनाक्यांवर न्यायाधीश, व्हीआयपींच्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा – मद्रास उच्च न्यायालय

108

चेन्नई, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर न्यायाधीश आणि व्हीआयपी यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आज (गुरूवार) दिले.  व्हीआयपी आणि न्यायाधीशांना टोलनाक्यांवर १० ते १५  मिनिटे थांबून ठेवणे, हे अतिशय दुर्दैवी आहे,  असे न्यायालयाने  म्हटले आहे.