टेल्को रोडवर बुलेट घसरुन झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी

743

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – बुलेट घसरुन झालेल्या भीषण अपघातात बुलेटस्वार तरुणाच्या डोक्याला आणि पायाला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.१२) रात्री साडेअकराच्या सुमारास टेल्को रोडवरील संघवी केसरी कॉलेज समोर झाला.  

प्रितेश बाळासाहेब दौंडकर (वय ३१, रा. श्रीकृष्ण इवेन्यु, स्पाईन रोड, प्राधिकरण) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रितेश हा त्याच्या ताब्यातील बुलेट ही दुचाकी घेऊन वेगाने टेल्को रोडवरील संघवी केसरी कॉलेज समोरुन जात होता. यावेळी प्रितेश याचा बुलेट वरील ताबा सुटला आणि गाडी फरफटत लांब जाऊन पडली. यामध्ये प्रितेश यांच्या डोक्याला आणि पायाला फ्रॅकचर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या बुलेटचेही नुकसाना झाले आहे. प्रितेश यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.