टेरर फंडिग प्रकरणी पुण्यातून फरार आरोपीस अटक

32

पुणे, दि. २२ (पीसीबी) –  काश्मीर, कर्नाटकसह अनेक राज्यात अतिरेकी कारवाया करण्यासाठी  पैसे पुरविल्या प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली आहे.

रमेश शहा (वय २८, मु.रा. बिहार, गोपळगंज, स.रा. नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर ‘टेरर फंडिग’च्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी  चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश शहा हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. शहा हा बिहारमधील गोपळगंज येथील राहणारा असून गोरखपूर येथे एक शॉपिंग मार्केट चालवतो. हे प्रकरण बाहेर आल्यापासून तो तेथून फरार होता. अनेक राज्यांमध्ये त्याचा शोध घेतला जात होता. यामुळे शहा हा गोरखपूरमधून गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. पुण्यातील नऱ्हे येथे तो लपला असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क केला. मंगळवारी सकाळी तो राहत असलेल्या खोलीवर छापा घालून त्याला ताब्यात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथक एकत्रीतपणे तपास करत आहेत.