टेम्पोमधून प्रेशरगेजचे दोन बॉक्स चोरीला

63

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – तीन अनोळखी चोरट्यांनी टेम्पोमधून प्रेशरगेजचे दोन बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेतीनच्या सुमारास परशुराम चौक, रेणुका कंपनी समोर, विद्यानगर, चिंचवड येथे घडली.

गौतम गणपत गायकवाड (वय 39, ओटा स्किम, निगडी) याप्रकरणी बुधवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या टेम्पोचा चालक लक्ष्मण हीरानाथ सुरवसे (वय 43, रा. परशुराम चौक, विद्यानगर, चिंचवड) यांनी टेम्पोमध्ये दोन लाख 80 हजार 967 रुपयांचे प्रेशरगेजचे तीन बॉक्स लोड केले. त्यानंतर चालक सुरवसे चौकात रेणुका कंपनीसमोर टेम्पो पार्क करून टेम्पोच्या केबीनमध्ये झोपले. त्यावेळी तीन अनोळखी चोरट्यांनी टेम्पोमधील प्रेशरगेजचे दोन बॉक्स चोरून नेले. पोलीस उपनिरिक्षक पतंगे तपास करीत आहेत.

WhatsAppShare