टिक टॉकवर धार्मिक भावना भडकवणारा व्हिडिओ बनवल्याने अभिनेता एजाज खानला अटक

212

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – धार्मिक भावना भडकवणारा टिक टॉक व्हिडिओ बनवल्याने अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी टिक टॉक अॅपवर ०७ या ग्रुपने तबरेज अन्सारी मॉब लिंचिंग घटनेवरुन एक वादग्रस्त व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या आरोपी तरुणांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून एजाजने त्यांचे समर्थन केले, तसेच आरोपी फैजू आणि त्याच्या इतर साथीदारांसह मिळून एजाजने धार्मिक भावना दुखावणारे अनेक व्हिडीओ बनवले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आज (गुरुवारी) एजाज खानला अटक केली. एजाजला यापूर्वी देखील अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.