टाटा उद्योग समूहाकडून ५०० कोटींची मदत जाहीर

94

 

मुंबई, दि.२९ (पीसीबी ) – टाटा उद्योग समूहाकडून आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. समूहाने ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत.

कोरोना आजारामुळे मानव जातीसमोर सर्वात मोठ संकट आले आहे. परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे देशासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत टाटा ट्रस्टने ५०० कोटी रूपये मदत म्हणून देत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

 

WhatsAppShare