झोपलेल्या जागी फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात

136

देहूरोड, दि. २९ (पीसीबी) – पती-पत्नी दोघेच घरी असताना पतीचा फावड्याने मारून निर्घुणपणे खून केला. याप्रकरणी संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 29) सकाळी सहा वाजता भैरवनाथ मंदिराजवळ, मामुर्डी गावात घडला आहे.
मयूर मोईन गायकवाड (वय 28, रा. मामुर्डीगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर त्याची पत्नी रितू मयूर गायकवाड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांपूर्वी मयूर आणि रितू यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना अद्याप मुलबाळ नाही. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये सतत भांडण होत होते. रितू काही वेळेला घरातून निघून जात होती.

सोमवारी दुपारी देखील रितू घरातून निघून गेली. मयूरचा भाऊ आणि आई हे दोघेजण एका रुग्णालयात काम करतात. सोमवारी रात्री दोघांची नाईट ड्युटी होती. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दोघेही कामावर निघून गेले. त्यावेळी मयूर घरी एकटाच होता. रात्री रितू घरी परत आली. दोघाजण घरात झोपले होते.
मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मयूरच्या डोक्यात फावड्याने मारून त्याचा खून करण्यात आला. घरात मयूर आणि त्याची पत्नीच असल्याने पोलिसांनी पत्नी रितू हिला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
मयूर बिगारी काम करत होता. त्यातूनच त्याचे रितू हिच्याशी सूत जुळल्याने दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare