झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

58

झारखंड, दि. १५ (पीसीबी) – झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील सहा जाणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. झारखंडच्या हजारीबाग परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कर्जबाजारीपणामुळे या ६ जणांनी आत्महत्या केली. सहापैकी पाच जणांनी फास घेवून आपले जीवन संपवले तर एकाने घराच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.