ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या महिनेच प्लॅन रचून पळवले लाखोंचे दागिने

267

तळेगाव दाभाडे, दि. २ (पीसीबी) – ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगार महिलेने दुकानातील चार लाख 18 हजार रुपये किमतीचे दागिने दुकानदाराच्या संमतीशिवाय नेत फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील संघवी ज्वेलर्स या दुकानात घडला.

अशोक जवेरचंद ओसवाल (वय 58, रा. तेलीआळी, तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तब्बल एक वर्षानंतर एक जानेवारी 2022 रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोर्णिमा आकाश पवार (रा. खंडोबामाळ, तळेगाव दाभाडे) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे तळेगाव दाभाडे येथे संघवी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्या दुकानात आरोपी महिला पौर्णिमा पवार काम करत होती. सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत फिर्यादी यांच्या संमतीशिवाय तिनेआहे 4 लाख 18 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने नेले. पोर्णिमा हिने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मतकर तपास करीत आहेत.