ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात

364

मुंबई, दि. १० (पीसीबी) – ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला आज (शुक्रवार) मुंबईतील चुनाभट्टी येथे विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. मात्र सुदैवाने सुधीर गाडगीळ यांना कुठलीही हाणी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दुपारी सुधीर गाडगीळ हे त्यांच्या कारने मुंबईतील चुनाभट्टी येथील चढावरुन जात होते. यावेळी समोरील एका कारने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात झाला. सुदैवाने गाडगीळांना कुठल्याही प्रकारची हाणी झालेली नाही. मात्र त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.