ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाची सुपारी मीच घेतली; परशुराम वाघमारेची कबुली

163

सोलापूर, दि. २६ (पीसीबी) –  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनाची सुपारी मीच घेतली होती, अशी धक्कादायक कबुली परशुराम वाघमारेने दिली आहे. एसआयटीने केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली.

तसेच सुपारी देणाऱ्यांनी पैसे न दिल्याचा देखील त्याने खुलासा केला. सुपारी देणाऱ्यांनी केवळ १० हजार रुपये अॅडव्हान्स आणि बंगळुरुत राहण्यासाठी तीन हजार रुपये दिले. उर्वरीत रक्कम न देताच ते पिस्तुल घेऊन फरार झाले, असे वाघमारेने एसआयटीच्या चौकशीत सांगितले.