ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती, ठाणे यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रम “मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे”

50

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती, ठाणे यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रम “मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे”. आपली मराठी रंगभूमी अतिशय समृद्ध अशी आहे. जुनी नाटकं, कलावंत, अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना या विषयी सुखद आठवणी आणि त्यावर खुसखुशीत शैलीत विवेचन असा “मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे” हा मनोरंजनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 ते 6.15 या वेळात श्री. चंद्रशेखर ठाकूर हे सादर करतील. यापूर्वी त्यांनी “चंद्र आहे साक्षीला” हा कार्यक्रम आपल्या ओंकार ज्येष्ठ नागरिक संघात केला होता. उपरोक्त कार्यक्रमात ठाकूर हे काही नाटकातील संवाद देखील म्हणून दाखवतील. लॉक डाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाची आखणी त्यानी केली आहे. सुप्रसिद्ध निवेदिका सौ.संध्या टेंबे सूत्र संचालन करतील। सर्वानी अवश्य लाभ घ्यावा. यु ट्यूब वर हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित होईल ज्यासाठी लिंक खालीलप्रमाणे.

WhatsAppShare