ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

151

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे राहत्या घरी निधन झाले.  विविध मालिकांमध्ये शुभांगी जोशी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या सध्या काम करत होत्या. या मालिकेतील त्यांची जिजीची भूमिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने सह कलाकारांना धक्का बसला आहे.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील त्यांनी साकारलेली गौरीच्या आजीची भूमिका गाजली होती. आभाळमाया या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.