ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल

189

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात आज (बुधवार) दाखल करण्यात आले आहे.

९५ वर्षीय दिलीप कुमार यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे दुपारी ४ वाजणाच्या सुमारास त्यांना वांद्रे परिसरातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दिलीप कुमार यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डिस्चार्जबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिलीप कुमार यांना अनेक वेळा रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे  डॉक्टरांनी सांगितले.