ज्या व्यक्तीने स्वतः च्या वडिलांना सांभाळले नाही ते तालुका काय संभाळणार – तुषार कलाटे

525

भोर,दि.०६(पीसीबी) – ज्या व्यक्तीने स्वतःच्या बापाला सांभाळले नाही त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला, जो व्यक्ती स्वतःच्या जन्म देत्या बापाला पोसू शकला नाही अशा व्यक्तीने आम्हाला नीतिमत्ता शिकावी का असा सवाल देखील युवा नेते तुषार कलाटे यांनी केला. स्वर्गीय तुकाराम हागवणे त्यांच्याबद्दल तालुक्याला व मला स्वतःला नेहमीच आदर राहिला आहे, जिल्ह्याचे नेते होते मात्र अशा व्यक्तीला साधं दोन टाईम जेवण सुद्धा तुम्ही दिले नाही तालुका सुधा जाणतो अशी टीका कलाटे यांनी केली. 2007 च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोणी पाडला याचासुद्धा उत्तर राजाभाऊ हागवणे देणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ होतात तर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार का पाडला आता तुम्ही असं दाखवत आहे की मी पक्षाचा खूप एकनिष्ठ आहे. खऱ्या अर्थाने राजाभाऊ हगवणे हे बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरले नाहीत हे यामधून स्पष्ट दिसून येत आहे. आत्माराम नानांचा विधानसभेला झालेला पराभव हा त्यांनी स्वीकारला आहे व जनतेचा कोल त्यांनी मान्य केलेला आहे.

मात्र तुम्ही आजपर्यंत एक तरी निवडणुकीत तुमचा विजय झाला का व तो का झाला नाही, साधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकता येत नाही. आत्माराम नानांचा व्यवसाय हा रिअल इस्टेट आहे हे अखंड तालुका जाणतो, मात्र राजू हगवणे यांनी किती जणांच्या जमिनी लाटल्या किती जणांचे मुंडके मोडले स्वतःच्या भावाच्या जमिनी तुम्ही लाटल्या, तुमच्यावर किती गुन्हे दाखल झाले आता ते जाहीर करावे का असा सवाल सुद्धा त्यांनी केला

आशा राजाभाऊ हागवणे यांनी आत्माराम नाना बद्दल बोलावे का ?
तुमचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहित आहे, राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर करावे एवढ्या खालच्या पातळीला तुम्ही येऊ नये अन्यथा आम्हाला देखील खालच्या पातळीला जावे लागेल, घर चालवणे पुरते पैसे आमच्याकडे आहेत राजकारणात आजपर्यंत आम्ही कुणाचा एकही रुपये घेतला नाही.

तर कुमार गोसावी यांचे काय घेणार, तुम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीत आमचा उमेदवार पाडला म्हणून विधानसभेला आम्ही कुमार भाऊंना पाठिंबा दिला असे स्पष्टीकरण कलाटे यांनी दिले. तुमचा खरा चेहरा आम्हाला जनतेसमोर उघड करायला भाग पाडू नका असा सज्जड दमही युवानेते तुषार कलाटे यांनी दिला.

WhatsAppShare