ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील, त्या दिवशी भाजप प्रवेशासाठी तयार – राधाकृष्ण विखे-पाटील

98

शिर्डी, दि. १२ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील, त्या दिवशी मी  भाजप प्रवेशासाठी तयार आहे, असे  राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (बुधवार)  सांगितले.

भाजप प्रवेश हा मुद्दा आज राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे, असे  राधाकृष्ण विखे पाटील यांनी  संगमनेरमध्ये   प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगून  भाजप प्रवेश औपचारिकता राहिली असल्याचे  स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,  राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काँग्रेसने माझी कोंडी केली असून आता पक्षात माझी घुसमट होत आहे, असे ते म्हणाले होते. काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.