जोपर्यंत जिल्ह्यात पिसाळलेली कुत्री आहेत तोपर्यंत माझी भूमिका पिसाळलेलीच असेल- रामराजे नाईक निंबाळकर

181

सातारा, दि.१४ (पीसीबी) –  जिल्ह्यात जोपर्यंत पिसाळलेली कुत्री आहेत. तो पर्यंत माझी भूमिकाही पिसाळलेलीच असेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंवर जहरी टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मिटिंग बोलावली आहे. त्यात मी त्यांना सांगणार आहे की तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत, असं रामराजेंनी म्हटलं आहे.

रामराजेंनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, रामराजे निंबाळकर विरूद्ध उदयनराजे भोसले हा वाद जुना असून साताऱ्यामध्ये पुन्हा पक्षांतर्गंत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं दिसत आहे.