जोपर्यंत उद्धव ठाकरे, दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत नारायण राणेंचा भाजप प्रवेश नाही

161

सिंधुदुर्ग, दि. ११ (पीसीबी) – जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होणार नाही, अशा शब्दांत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ठणकावून सांगितले.  ते सिंधुदुर्गात बोलत होते. 

नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाबद्दल स्वत:च तारीख जाहीर केली आहे. शिवसेनेला विचारात घेऊनच राणे यांना प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  यावर केसरकरांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ठाम विरोध आहे, असे सांगितले.

दीपक केसरकर यांच्यावर शिवसेनेचेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घणाघाती आरोप केले आहेत.  या आरोपांचा केसरकरांनी खरपूस समाचार घेतला. साळगावकर यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्न पडत असल्याने हे आरोप करत आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.