जैन युवाचार्य महेंद्र ऋषीजी म.सा.यांचा चिंचवडगावात मंगल प्रवेश

61

चिंचवड, दि.18 (पीसीबी) : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व कल्याण प्रतिष्ठान यांच्या वतीने आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा.यांचे शिष्य व वर्तमान आचार्य डॉ.शिवमुनिजी म.सा.यांचे अनुयायी जैन युवा चार्य महेंद्र ऋषीजी म.सा.व हितेश ऋषीजी म.सा. तसेच उपप्रवर्तीनी साध्वी रत्ना प.पू. सन्मतीजी म.सा.आदी ठाणा पाच यांचा चातुर्मास निमित्ताने आज मोठ्या उत्साहात मंगल प्रवेश चिंचवड गावातील कल्याण प्रतिष्ठाण (सुखी भवन) येथे झाला.

श्रीधर नगर मधील संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र जैन यांच्या निवासस्थानात सकाळी भक्ताम्बर जाप करण्यात आला.आठ वाजता तानाजी नगर मार्गे महाराज केशवनगर कडे मार्गस्थ झाले.शहरातील जैन समाज बाधवांनी शासनाच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करून त्यांचे स्वागत केले.विविध पारंपरिक वेशभूषा करून अनेकांनी जैन धर्म गुरूंचा जागोजागी जयघोष केला.विर विशाल संघ,चातुर्मास कमिटी व महिला मंडळाने विशेष योगदान दिले.प्रवेश झाल्यावर गुरू भगवंतांनी महामांगलिक मंत्र पठण केले.

या प्रसंगी संघाचे अध्यक्ष अशोक बागमार माजी अध्यक्ष दिलीप नहार व कल्याण प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुरेश सेठिया,जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी,राजेश साकला, प्रा.अशोक पगारिया,सुरेश गादिया,रुचिरा सुराणा,माजी महापौर ,नगरसेवीका अपर्णा डोके,अश्विनी चिंचवडे,नगरसेवक राजेंद्र गावडे,ब प्रभाग सभापती सुरेश भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.

संघाच्या वतीने चातुर्मास अध्यक्ष म्हणून राजेश साकला यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.जैन धर्मियांमध्ये चातुर्मास कार्यकाळाला विशेष महत्व आहे.यानिमित्त तप,साधना व प्रवचन या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या वर्षीच्या या ऐतिहासिक चातुर्मासाचा लाभ पिंपरी-चिंचवड मधील सर्व जैन बांधवांना मिळाला आहे.या कार्यकाळात जास्तीत जास्त धार्मिक विधी व सामाजिक उपक्रमात शासनाच्या कोरोना विषयक नियमानुसार सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपाध्यक्ष संतोष धोका,प्रास्ताविक अध्यक्ष अशोक बागमार, गुरू महाराजांचा परिचय प्रसिद्धी प्रमुख मनोज बाफना यांनी दिला.सचिव नंदकुमार लुनावत यांनी आभार मानले.
फोटो: जैन युवा चार्य महेंद्र ऋषीजी म.सा.आदी गुरू भगवंत चातुर्मास निमित्त चिंचवड गावातील कल्याण प्रतिष्ठाण (सुखी भवन)येथे मंगल प्रवेश करून वास्तव्यास आले.

WhatsAppShare