जेम्स बॉण्ड ‘डेनियल क्रेग’ बॉम्ब स्फोटात जखमी

178

इंग्लंड, दि. १६ (पीसीबी) – चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बॉम्ब स्फोट होऊन जेम्स बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता डेनियल क्रेग जखमी झाला आहे.

जेम्स बॉण्ड मालिकेतील अगामी चित्रपट बॉण्ड २५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तीन बॉम्ब स्फोट झाले यातील एका स्फोटात डेनियल क्रेग व काही सहकलाकार जखमी झाले.

ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बॉण्ड हा अॅक्शन स्टार म्हणून लोकप्रिय आहे. त्यामुळे बॉण्डपटांमध्ये आपल्याला भरपूर अॅक्शन सीन पहायला मिळतात. असेच काही अॅक्शन सीन चित्रित करण्यासाठी दिग्दर्शकांमार्फत काही बॉम्ब स्फोट घडवण्याची योजना आखली गेली. या स्फोटांचा उद्देश केवळ चित्रपटाचे चित्रीकरण एवढाच होता. त्यामुळे यात वापरल्या जाणाऱ्या विस्फोटकांची क्षमता फार कमी होती. परंतु प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाले. आणि तीन बॉम्ब एकाच वेळी फुटले. परिणामी एक मोठा विस्फोट झाला. या विस्फोटात अभिनेता डॅनियन क्रेग व काही सहकलाकार जखमी झाले. त्यानंतर डॅनियल व इतर कलाकारांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या या सर्व जखमींची प्रकृती व्यवस्थित आहे. या स्फोटात कलाकार जखमी झालेच शिवाय महागडे कॅमेरे, काही तांत्रिक उपकरणे व संपूर्ण स्टुडिओचे नुकसान झाले.