जेजुरी परिसरातील कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात

133

जेजुरी, दि. ७ (पीसीबी) – साक्षीदारांना आणि फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडील २४ हजाराची रोकड चोरून नेणारा कुख्यात गुंडा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ६) जेजुरी पोलिसांनी केली.

गणेश विठ्ठल रासकर (वय ३८, रा. नीरा, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि साक्षीदारांना मारहाण करून पसार झालेल्या गणेस रासकराला शोधण्यासाठी जेजूरी पोलिस ठाण्याचे दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकातील लोणंद परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्याच्या दहशतीमुळे कोणीच माहिती देण्यास तयार होत नव्हता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सापळा रचून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि. १३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस तपास करत आहेत.