जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

148

दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने गोळाबार केला. या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास दिल्लीतील कॉस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे आज (सोमवार) सकाळी एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उमर खालिद सहभागी होणार होता. सकाळी खालिद क्लबच्या बाहेर पोहोचताच अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने उमर खालिदने तिथून पळ काढला आणि तो बचावला. गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पसार झाला. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केली असून या घटनेने दिल्ली पोलिसांवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

दरम्यान, दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील मुख्य ठिकाणी पोलिसांचे पथकही तैनात आहेत. अशा स्थितीत हल्लेखोर बंदुक घेऊन कॉन्स्टिट्यूशन कल्बच्या आवारात कसा पोहोचला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.