जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीद विरोधात गुन्हा

96

दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीद विरोधात वकील आलोक अलख श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार केली आहे. शेहलाने तिच्या ट्विटसच्या माध्यमातून भारतीय लष्करावर निराधार आरोप केले आहेत, असा आरोप श्रीवास्तव यांनी केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शेहला राशीद हिच्याविरोधात देशद्रोह आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये वैमनस्य पसरवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

शेहला राशीदने १८ ऑगस्टला केलेल्या ट्विट्सच्या आधारावर आपण ही तक्रार दाखल केली असल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. शेहलाच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १२४ ए, १५३, १५३ ए, ५०४, ५०५ आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे.