जुन्या सांगवीतून रिक्षा चोरीला

41

सांगवी, दि. १३ (पीसीबी) – जून्या सांगवीतून एक रिक्षा चोरीला गेली. ही घटना 1 मे रात्री आठ ते 2 मे सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

गोपीनाथ तुलशीराम बिराजदार (वय 51, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची रिक्षा त्यांच्या घराजवळ रस्त्याच्या बजूला पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरुन नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.