जुन्या शनायाची जागा मला घेता येणार नाही- ईशा केसकर

178

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – खरे तर खलनायिकेची व्यक्तिरेखा तशी सगळ्यांच्याच नावडीची . खलनायकाला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते पण, ‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाच्या बाबतीत वेगळेच घडले. प्रेक्षकांचे उदंड प्रेम तिला लाभले, म्हणूनच तिच्या मालिका सोडून निघून जाण्याच्या निर्णयाचे सगळ्याच प्रेक्षकांना दु:ख झाले. आता या मालिकेत शनाया म्हणजेच रसिका सुनीलची जागा ‘जय मल्हार फेम ईशा केसकर साकारणार आहे.

मात्र रसिकाने साकारलेली शनाया नव्याने साकारण्याचे मोठे आव्हान ईशासमोर असणार आहे. नव्या शनायाची मालिकेत एण्ट्री झाल्यानंतर ईशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने रसिकाच्या अभिनयाचे कौतुकही केले आहे.

‘रसिकाने शनायाची भूमिका उत्तमरित्या साकारली आणि आता हीच भूमिका माझ्या वाट्याला आलीय. एखाद्याने एवढ्या चिकाटीने, कष्टाने बांधलेले केरेक्टर सोडून जाणे सोपे नाहीच! पण नवीन कलाकाराने ते पुन्हा आधीसारखे नव्याने जिवंत करणे हे ही तितेकच अवघड आहे. जुन्या शनायाची जागा मला घेता येणार नाही, पण मी प्रॉमिस करते की मी माझे १००% ह्या पात्राला देण्याचा प्रयत्न करेन. ‘ असे ईशाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.