जुन्या कामगार नेत्यांमुळे कामगार संघटना बळकट – शरद पवार

157

तळेगांव, दि. १ (पीसीबी) – जुन्या कामगार नेत्यांमुळे कामगार संघटना बळकट आहेत. मात्र आता खूप संघटना नाहीत. कामगार संघटना मजबूत होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ असले पाहिजे, असे सध्याच्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. त्यामुळे कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

तळेगाव येथे कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याचे  पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

नक्षल चळवळीशी संबंधित काही जणांना अटक केली आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने यावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, जे कोणी सरकार बदलण्याची भाषा करत आहे. त्यांना नक्षली ठरवले जात असेल तर ते योग्य नाही, असे पवार म्हणाले .   विचारधारा मान्य नसेल तर जनतेला सरकार बदलण्याचा अधिकार त्यांना लोकशाहीने दिला आहे, असेही पवार  यांनी  स्पष्ट केले.