जुनी सांगवीत माई ढोरे, हर्षल ढोरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट किडज प्री स्कूल’चे उद्‌घाटन

438

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – जुनी सांगवीतील ढोरेनगर येथील लेन नंबर दोन येथे स्मार्ट किडज प्री स्कुलचे उद्‌घाटन नगरसेविका माई ढोरे व नगरसेवक हर्षल ढोरे यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, स्मार्ट किडज प्री स्कुलचे मुख्याध्यापक आशिष काळोखे, व्हेनेसा काळोखे, पास्टर अल्फान्सो जोसेफ, मेरी डिक्रुझ, विजयमाला काळोखे, तृप्ती कांबळे आदी उपस्थित होते.

स्मार्ट किडज प्री स्कुलमध्ये प्रिस्कुल, डे केअर, नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. जुनी सांगवी व नवी सांगवीमधील सर्वात मोठी प्री प्रायमरी शाळा असून वंचित मुलासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. उत्कृष्ट शिक्षक वर्ग, विविध रंगाचे आकर्षक वर्ग, एलसीडी प्रोजेक्टर , स्वछ भारत अभियान शाळेमध्ये चालविले जाते. ई लर्निंग, डॉलरूम, बॉलरूम, डायनिंग रूम , मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा व बसेसची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आशिष काळोखे यांनी दिली.