जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत माता-पिता पाद्यपूजनाने गुरुपौर्णिमा साजरी

34

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – गुरुपौर्णिमेनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयामध्ये माता-पिता पाद्यपूजन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडीलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्याच पाल्याने केलेल्या पाद्यपूजनाने पालकांचे मन भारावून गेले, तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञेने पालकांचे डोळे पाणावले. यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे माता-पिता देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.