जुना बाजार होर्डिंग दुर्घटने प्रकरणी कॅप्शन या जाहिरात कंपनीच्या मालकाला अटक

676

पुणे, दि. ११ (पीसीबी) – पुण्यातील जुना बाजार चौकात ५ ऑक्टोबरला घडलेली होर्डिंग दुर्घटने प्रकरणी कॅप्शन या जाहिरात कंपनीचे मालक अब्दुल रझाक मोहम्मद खालीद फकी याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. याआधी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती.  

कॅप्शन जाहिरात कंपनीने याआधी दुर्घटनेसाठी मध्य रेल्वे जबाबादार धरत हात वर केले होते. मात्र कॅप्शन या जाहिरात कंपनीचे मालक अब्दुल रझाक मोहम्मद खालीद फकी यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमधे लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डींग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डिंग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती. यामुळे हि दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले होते. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.